आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा ; संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

मुंबई : आमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे करुणेचा सागर आहेत. करुणा भावनेने त्यांना कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपाल भगतसिंह यांना महाराष्ट्रत रमावं वाटतं. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत, असे संजय राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

मागील कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. याच मुद्द्यावर ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER