शिवसेना आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव फसला – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) याची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचं एम्सच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. सुशांत प्रकरणावरुन विरोधकांनी महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर आणि शिवसेनेवर अनेक आरोप केले होते. मात्र एम्सच्या अहवालाने शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विरोधकांचा मोठा डाव फसला असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपसह अनेकांवर घणाघाती टीका केली. आज सकाळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, सत्य हे कधीच लपवता येत नाही. सुशांतसिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आले आहे. याप्रकरणी ज्यांनी शिवसेनेची आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कुटील डाव रचला तो डाव पूर्णपणे फसला. शंभर दिवस खाजवूनही शेवटी हाती काय लागले? सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले आहे. सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER