
मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटिसीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे . ‘ईडी आणि केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) हे टोकण आहे. डिसेंबरपर्यंत भाजपची डेडलाईन होती. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी ईडीकडून प्रयत्न सुरू आहे.
बायकांच्या पदराच्या आड खेळी खेळीत आहे’ असंही राऊत म्हणाले. भाजपचे तीन नेते हे सतत ईडीच्या कार्यालयात जाऊन कागदपत्र घेऊन येत आहेत. त्यानुसारच हे नेते बोलत आहेत. गेल्या वर्षभरापासून भाजपचे काही नेते आणि हस्तक हे मला सातत्याने येऊन भेटत आहेत. या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचे ठरवले आहे. या ना त्या मार्गाने इशारे देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागेही मला धमकावण्यात आले आहे, असे आरोप राऊत यांनी केले .माझ्या पत्नीच्या खात्यावर १० वर्षांपूर्वीचे हे व्यवहार आहे.
मुंबईत (Mumbai) घर घेण्यासाठी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासंदर्भात ईडीला आता जाग आली आहे. भाजप सरकार सत्तेवर येत नाही म्हणून ईडीकडून नोटीस पाठवली जात आहे, असा खुलासाही राऊत यांनी केला. ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही. कधी काळी या संस्थांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. सीबीआय, आयकर विभागाने काही कारवाई केली तर त्यात गांभीर्य होते; पण, गेल्या वर्षात ईडीने नोटीस बजावणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने भडास काढणे हे गृहीत धरले आहे. आतापर्यंत एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आल्या आहेत. शरद पवार यांनासुद्धा ईडीने नोटीस बजावल्या आहेत, असेही राऊत म्हणाले. राजकीयदृष्ट्या दबावाला बळी पडत नाही म्हणून ईडीचा वापर केला जात आहे. हे वैफल्यग्रस्त झाले आहे. राजकारणामध्ये समोरासमोर येऊन लढण्याची इच्छा असायला हवी.
घरातील मुलांना, महिलांवर अशी कारवाई करत असाल तर याला नामर्दपणा म्हणतात. असा नामर्दपणा जण कुणी करत असेल तर शिवसेना त्याच शब्दांत आणि त्याच स्तरारला जाऊन उत्तर दिले जाईल. जर लढायचे असेल तर समोरासमोर येऊन लढावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.
ही बातमी पण वाचा : ईडीच्या नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया , म्हणाले…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला