शिवसेनेविरोधात गरळ ओकणारे आता कुठे गेले; ‘त्या’ क्लीपवरून राऊतांची आगपाखड

Sanjay Raut criticise BJP over clip-of-tanhaji-movie

मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या तान्हाजीचित्रपटातील मॉर्फिंग केलेली क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा मॉर्फ केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे .

ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे. त्यानंतरच आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब असते तर, आव्हाडांचे हे विधान खपवून घेतले नसते