अनेक खटले पाहिले, मला मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून कुणी थांबवू शकत नाही : संजय राऊतांचा टोला

Kangana Ranaut-Sanjay raut

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) आणि अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) यांच्यात वाद सुरु आहेत . माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

अभिनेत्री कंगना रनौत कार्यालय पडल्याप्रकारानी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (HC) संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे . एका अभिनेत्रीने उच्च न्यायालयात महापालिकेने अवैध बांधकामाबाबत केलेल्या कारवाईबाबत याचिका दाखल केली आहे. महापालिका ही स्वायत्त संस्था आहे. मात्र तरीही यात राज्यसभेच्या खासदाराला पक्षकार करण्यात यावे, अशी मागणी तिने केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

बाबरी खटला असो किंवा मराठी अस्मितेबाबतची केस असो, अशा अनेक खटल्यांना सामोरा गेलो आहे. तेव्हा अशा केसमुळे माझ्या शहराच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढण्यापासून मला कुणी थांबवू शकत नाही, असा टोला राऊत यांनी कंगनाला लगावला आहे .

ही बातमी पण वाचा :  संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार ; प्रतिवादी करण्याची कंगनाला उच्च न्यायालयाची परवानगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER