मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीये, ती…; संजय राऊत

Sanjay Raut & Kangana ranaut

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) विरोधी पक्षांसह अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana Ranaut) भाष्य केले . बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते .

सध्या सुरु असलेल्या वादासंर्भात ‘शिवसेना पुढे काय करणार?

या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले,”तुम्हाला असं वाटत नाही का, की तुम्ही वारंवार शिवसेनेला प्रश्न विचारताय. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीय, ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची मुंबई आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), शेकाप असे सगळे एकत्र आहेत. म्हणून तर यासंदर्भात सर्वांत आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), सचिन सावंत (Sachin Sawant) या तिघांनीही ठामपणे सांगितले , मुंबईविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे, एखाद्या पक्षाचा आहे?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER