फडणवीस आमचे वैयक्तिक शत्रू नाही, भेटीची उद्धव ठाकरेंना माहिती होती – संजय राऊत

Sanjay Raut-Devendra Fadnavis

मुंबई : शनिवारी शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उधाण आले आहे. अखेर आज खुद्द संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुप्त भेटीबद्दल खुलासा केला आहे.

काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.

आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही. फडणवीस यांना उद्धव ठाकरेही मानतात. फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण करोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असेही राऊत म्हणाले.’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

तसंच, ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यक संस्था आहे. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह आहे, असंही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना व अकाली दल हे ‘एनडीए’चे मजबूत स्तंभ होते. शिवसेनेला मजबुरीने‘एनडीए’च्या बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडला आहे. एनडीएला आता नवे सहकारी मिळाले आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER