सुशांतने ड्रग्ज घेतले होते हे मुंबई पोलिसांना माहिती होते – संजय राऊत

Sushant Singh Rajput case-Sanjay Raut

मुंबई :- अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी मृत्यूच्या आधी ड्रग्स खाल्ल्याचे मुंबई पोलिसांना माहित होते, असा दावा शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोमवारी केला. मात्र, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर त्यांची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पोलिसांनी ही माहिती उघड केली नाही. असे राऊत यांनी सांगितले आहे.

अभिनेता सुशांतसिंगची हत्या नाही तर आत्महत्याच आहे हे एम्सच्या अहवालानंतर स्पष्ट झाले आहे असेही संजय राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण सीबीआयकडे गेले आणि सुशांत ड्रग्ज घेत होता अशा बातम्या माध्यामांमध्ये येत होत्या. मुंबई पोलिसांना हे माहिती होते मात्र, मुंबई पोलिसांनी यावर बोलमे टाळले असे राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच, राऊत म्हणाले, सुशांत ड्रग्ज घेतल्याची माहिती मुंबई (Mumbai) पोलिसांकडे होती आणि ती पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही होती. राऊत म्हणाले, मुंबई पोलिसांना कोणाच्याही मृत्यूनंतर कोणाला बदनाम करायला आवडत नाही. आम्हाला त्याचे चारित्र्य हनन करायचे नव्हते. आम्ही नैतिकदृष्ट्या वागलो आणि तो ड्रग्ज घेत होता हे उघड केले नाही. ज्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे तेच सुशांतची बदनामी करत आहेत असे राऊत म्हमाले.

राऊत म्हणाले की, एम्सच्या अहवालात ही सुशांतची हत्या नसून आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरकारसाठी खड्डे खोदणारे स्वतःच त्या खड्ड््यात प़डले आहे असेही राऊत म्हणाले. तसेच सुशांतचा आत्महत्येमुळे मृत्यू झाल्याचे पुष्टी करणारे एम्सचा फॉरेन्सिक विभाग प्रमुख सुधीर गुप्ता हे काही शिवसैनिक नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

एवढेच नाही तर राऊत यांनी मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त काय म्हणाले त्याचीही पुष्टी जोडली.

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह सोमवारी याबाबत बोलण्यासाठी उपलब्ध नव्हते. मात्र, दुसर्‍या एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला सांगितले की, सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांनी या विषयाला राजकीय रंग येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असे म्हणाले.

तसेच, सीबीआयच्या चौकशीत सुशांतचा मृत्यु आत्महत्येने झाल्याचे सिद्ध केले मात्र, मुंबई पोलिसांनी हा विषय आधीच अत्यंत व्यावसायीक पद्धतीने हाताळला होता व मुंबई पोलिसांना हे माहिती होते की, सुशांतची हत्या नाही तर आत्महत्याच आहे. मुंबई पोलीसांची कामगिरी नेहमीच उत्तम राहिली आहे. तसेच, कूपर रुग्णालयातील डॉक्टर आणि आमच्या न्याय वैद्यकीय तज्ञांनी एक व्यावसायिक काम केले होते असेही संजय राऊत म्हणाले. िकॉनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांच्या ‘त्या’ भूमिकेला हरताळ लावण्याचे काम संजय राऊतांनी केले : रामदास आठवले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER