अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वगैरे अतिरेक; दया, कुछ तो गडबड है… संजय राऊतांचे ट्विट

Sanjay Raut

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुंबई-नागपूर घरांसह दहा ठिकाणी छापे घालून तपासणी सुरू आहे. या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शंका उपस्थित करतानाच भाजपच्या दिशेने बोटही दाखवलं आहे. दया, कुछ तो गडबड है, असे म्हणत संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईवरच शंका निर्माण केली आहे.

संजय राऊत यासंदर्भात ट्विट करत म्हणाले की , यावेळी त्यांनी ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते शिवाजी साटम यांचा ‘दया, कुछ तो गडबड है’ हा संवाद वापरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कुछ तो गडबड है… माननीय उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी. एफ.आय.आर. वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय्य व तर्कसंगत दिसत नाही. दया, कुछ तो गडबड जरूर हैं, असं म्हणत राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button