संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करू शकतात : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & sanjay Raut

मुंबई : घटना आणि राजकारण यावर रोखठोकपणे भाष्य करणाऱ्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल काँग्रेसमध्ये नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही संजय राऊत यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यूपीएचे (UPA) नेतृत्व करावे, त्याचबरोबर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासह अनेक नेत्यांनी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, पाटील यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली.

शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात चंद्रकात पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना म्हणाले की, प्रतिक्रिया देणे बरोबर नाही, असे म्हणत पाटील यांनी संजय राऊतांना टोला लगावला.

गेल्या वर्षभरात संजय राऊत असे नेते झाले आहेत की, ते चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करू शकतात. मी सामान्य माणूस आहे, त्यांनी काय म्हटले यावर प्रतिक्रिया देणे बरोबर नाही, असे पाटील म्हणाले.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते. विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नांदेडमधील हल्लासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, “नांदेडमधील हल्ल्याचे समर्थन होणार नाही, पोलिसांवरील हल्ल्याचे तर कधीच नाही, आम्ही सत्तेत असो किंवा नसो. पण, हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला, याचा विचार ठाकरे सरकारने करावा. ” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष
स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न हा मोठा विषय आहे, महाराष्ट्रात ७० लाख लोकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस दिली आहे. त्यापैकी, लाखो लोक आणि हजारो शेतकरी या पंढरपूर-माढा मतदारसंघातील आहेत. पाणी असूनही केवळ वीज नसल्याने येथील शेतकऱ्यांना पाणी वापरता येत नाही, वाढीव वीज बिलाचा असंतोष नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही निवडणूक चालणार आहे. लोकांच्या मनात असलेला उद्रेक मतांच्या रूपातून बाहेर येईल आणि आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटील व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button