संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

Sanjay Raut

मुंबई :- सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना या वर्षीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार (Master Dinanath Mangeshkar) जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांनादेखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मागील अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

ही बातमी पण वाचा : अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button