संजय राऊत यांनी वझे-शिवसेना कनेक्शनचे उत्तर टाळले

Vaze-Shiv Sena connection

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह काल सापडला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वझे यांचे नाव संशयाच्या भोवऱ्याता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे(Sandeep Despande) यांनी सचिन वझेंवर गंभीर आरोप केले आहेत.

संदीप देशपांडे यांनी एका ट्विटमधून सचिन वाझेंचे शिवसेना कनेक्शन समोर आणत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. सगळ्या महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात?, असे प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केले आहेत.

याबद्दल पत्रकारांनी विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलणे टाळले. याबद्दल मी बोलने योग्य ठरणार नाही, इतकच राऊत म्हणालेत. मनसुख हिरेन प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य असेल, असे संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे? आशिष शेलारांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER