आधी फडणवीस म्हणाले फासा आम्हीच पलटणार, आता संजय राऊत म्हणाले …

sanjay-raut--devendra-fadnavis

मुंबई : फासा आम्हीच पलटणार, शिडीशिवाय फासा पलटणार, असे वक्तव्य करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा सत्तांतर करण्याबाबत पुडी सोडली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले . देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा, असे उत्तर देत राऊतांनी अधिक भाष्य करणं टाळले .

राज्यात सर्वात कमी संख्याबळ असलेली काँग्रेस सत्तेत आहे. त्यांचा आघाडी सरकारला पाठिंबा आहे. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे, असं सांगतानाच “आम्हीच फासा पलटवू, शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल” असं सूचक भाष्य फडणवीसांनी केलं होतं. मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या टर्न टेबल लॅडरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दरम्यान नानांवर टीका नाही, कौतुक केले. काँग्रेस हा देशात महत्त्वाचा राजकीय पक्ष सत्तेत नसला तरी परंपरा, इतिहास मह्त्त्वाचा, देशात संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा, परिवर्तन हा अंतर्गत प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले .

ही बातमी पण वाचा : नाना पटोलेचा राजीनामा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज; संजय राऊतांचा दुजोरा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER