संजय राऊत सपत्नीक पवारांच्या घरी, ईडीचा फास सैल करण्याबाबत घेतला सल्ला?

मुंबई : प्रमुख नेत्यांवर झालेल्या आरोपांमुळे महाविकासआघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सपत्नीक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले होते. यावेळी संजय राऊत यांच्याबरोबर मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली होती. मात्र, काहीवेळातच ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचे स्पष्ट झाले. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचे निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होेते, अशी माहिती देण्यात आली.

मात्र ही कौटुंबिक भेट असली तरी, वर्षा राऊत यांच्यावर ईडीचा असलेला फास सैल कसा करता येईल याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याकडून २०१०मध्ये ५५ लाख रुपयांचं कर्ज घेतल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली होती. यासंदर्भात ४ जानेवारी रोजी ईडीची चौकशी झाल्यानंतर आता वर्षा राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या पत्नीकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत केले आहे. आणि याच मुद्द्यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. शेवटी राऊत साहेबाना पैसे परत करावेच लागले. मात्र त्यांना हिशोब द्यावाच लागेल, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्याशी संजय राऊतांची सपत्नीक भेट महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनीप्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत. तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे. यावरुन दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप होत आहेत. मग त्यांनी दररोज राजीनामा दिला पाहिजे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER