केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर आता याप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एनआयएने शनिवारी सचिन वाझे(Sachin Vaze) यांची तब्बल १३ तास कसून चौकशी केली होती. या चौकशीत एनआयएच्या(NIA) हाती काहीतरी सबळ पुरावा लागल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.तर दुसरीकडे वाझेंच्या अटकेनंतर विरोधीपक्ष असलेला भाजपा अधिकच आक्रमक झाली असून, ठाकरे सरकारचा(Thackeray Govt) खरा चेहरा लवकरच पुढे येईल, असा दावा केला आहे.

यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay Raut)यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरितीने तपास करत असताना केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने राज्याच्या तपासात घुसखोरी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलिसांना स्वतंत्रपणे काम करू दिले पाहिजे. मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली नाही. त्यांचा तपास योग्य दिशेने सुरू होता. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसच्या कामांची स्तुती इतर देशातही केली जाते. मात्र केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने राज्याच्या तपासात घुसखोरी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER