संजय राठोड आज राजीनामा देणार? संजय राऊतांचे रोखठोक संकेत

Sanjay Rathore-Sanjay Raut

मुंबई : पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathore) यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती असून, ते कोणत्याही क्षणी राजीनामा देतील, अशी दाट शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी वर्षा या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक घेऊन राठोडांच्या राजीनाम्यावर चर्चा केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतली याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. मात्र आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संजय राठोडांच्या राजीनाम्यावर संकेत दिले आहे.

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजयांना सिंहासनावर बसलेला फोटो टाकलेला आहे. या फोटोत शिवाजी महाराजांच्या हातात राजदंड असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी सूचक वाक्यही लिहले आहे. सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो? असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन असे सूचक उत्तरही त्यांनी दिले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे संजयराठोड यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले असून, कुठल्याहीक्षणी ते राजीनामा देतील अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

दुसरीकडे संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या मुंबईतील छेडा सदनबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. यात महिला पोलिसांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER