
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड(Sanjay Rathore) यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो मंजुरीसाठी अजून राज्यपालांकडे पाठवला नाही; त्यामुळे संजय राठोड अजूनही मंत्री आहेत! राठोडांचा राजीनामा ही धूळफेक आहे, असा दावा भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
चित्रा वाघ यांनी याबाबत ट्विट केले – मा. मुख्यमंत्रीजी, संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन ३ दिवस झालेत पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही. राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आजही मंत्री आहेत. ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेक आहे. या संदर्भात ‘वाण नाही पण गुण लागला’ हे तुमच्याबाबत होऊ देऊ नका’.
फ्रेम करून ठेवला का? – संजय कुटे
याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक प्रश्न संजय कुटे मुख्यमंत्र्यांना विचारला.
मा.मुख्यमंत्री जी
संजय राठोड चा राजीनामा घेऊन ३ दिवस झाले पण तो राज्यपालांकडे पाठवलेला नाही
राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही तोवर संजय राठोड आज ही मंत्री आहेचं..ही राज्यातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे झाले
या संदर्भात”वाण नाही पण गुण लागला”हे तुमच्याबाबतीत होऊ देऊ नका pic.twitter.com/copfCeWEKn— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला