संजय राठोडांनी पोहरादेवीजवळ सत्य बोलावं …

Sanjay Rathore

बीड :  पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनाला जात आहेत. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही आहेत.

पोहरादेवी गडावर गेल्यानंतर संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पूजा चव्हाण हिच्याबाबत केलेल्या आपल्या कृत्याची कबुली द्यावी, असे वक्तव्य पुजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केले आहे.

संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर गेल्यानंतर सत्य बोलावे. त्यांनी खोटं बोलून बंजारा समाजाची दिशाभूल करु नये. त्यांनी आपल्या कृत्याची कबुली द्यायला पाहिजे, असे शांताबाई राठोड यांनी म्हटले. याशिवाय, 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यापूर्वी शांताबाई राठोड यांनी संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला होता. पूजा चव्हाण हिला गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता.

पूजाच्या कुटुंबीयांचे कॉल डिटेल्स तपासा –

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) अरुण राठोडची नार्को चाचणी करा, अशी मागणी पूजाच्या चुलत आजीने केली आहे. तसेच पूजाच्या कुटुंबीयांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण दबाव टाकतोय स्पष्ट होईल असेही शांताबाई म्हणाल्या आहेत. पूजाला न्याय मिळाला पाहिजे, दोषी कोणीही असो. अरुण राठोड किंवा कोणीही, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे शांताबाई राठोड यांनी म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER