संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे; अतुल भातखळकर यांची बोचरी टीका

Atul Bhatkhalkar-Sanjay Rathod

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड घटना घडल्यापासून सुमारे १५ दिवस बेपत्ता होते. आज पोहरा देवी येथे लोकांसमोर आलेत. संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी पोहरादेवी येथे समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. राठोड घरातून निघाल्यानंतर गाड्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. यावरून भाजपायाचे नेते अतुल भातखळकर यांनी त्यांची तुलना गुंड गजा मारणेशी करत टीका केली – संजय राठोड (Sanjay Rathod) हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत.

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट केले – संजय राठोड हे बोटचेप्या ठाकरे सरकारमधील गजा मारणे आहेत. तो गुंड होता हे मंत्री आहेत एवढाच फरक. समाजाला टाचेखाली चिरडणारीची दबंग मानसिकता सारखीच आहे.

जंगल मंत्री संजय राठोड पोहरा गडावर शक्तिप्रदर्शन करणार असतील तर संशयित गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने निरर्थक शक्ती कायद्याची टिमकी वाजवून नये. तसेच मुख्यमंत्र्यांनी घरबसल्या जनतेला उपदेश करणारे रटाळ फेसबुक लाईव्ह कार्यक्रम करू नयेत, असा टोमणा त्यांनी मारला.

गजा मारणे प्रकरण

अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खून प्रकरणात सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. गेल्या सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत गोंधळ घातला. फटाके फोडले. ड्रोण कॅमेऱ्याने त्याचे चित्रीकरणही केले. चित्रीकरण करतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोथरुडमध्ये मंगळवारी (दि. १६ ला ) रात्री गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यानंतर गजा मारणेला पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER