मंगळवारी संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीला येणार; पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

Sanjay Rathod

वाशिम : पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्युप्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाचं चित्र दिसत असतानाच आता अखेर ते सहपरिवार मंगळवारी सर्वांसमक्ष येणार आहेत. येत्या मंगळवारी ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे येऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे राठोड यावेळी माध्यमांशी बोलणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली. संजय राठोड यांना आम्ही पोहरादेवीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या कार्यालयातून आम्हाला त्यांच्या भेटीची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. राठोड हे येत्या मंगळवारी २३ तारखेला पोहरादेवीला येणार आहेत. या ठिकाणी ते सहकुटुंब येतील आणि देवीचं दर्शन घेतील, असं सुनील महाराजांनी स्पष्ट केलं.

‘या’ प्रश्नांची उत्तरे देणार?
महंतांनी दिलेल्या माहितीमुळे अखेर संजय राठोड १५ दिवस नॉट रिचेबल राहिल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसणार आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावर राठोड बोलणार का? बोलले तर ते काय बोलणार? ते भाजपने केलेले आरोप खोडून काढणार का? ऑडिओ क्लिप्समधील आवाजाबाबत काय सांगणार? आदी प्रश्नांची उत्तरे राठोड हे मीडियाशी बोलल्यानंतरच मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER