
मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणात अरूण राठोड यांचे नाव समोर येत आहे. सोशल मीडियात पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत आहे. यात वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली. असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. यासाठी पुरावा म्हणून देण्यात आलेला ऑडिओ क्लिपमधला आवाज कोणाचा आहे, याचा तपास सुरू आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाष्य केले. भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे. नियमानुसार संजय राठोड (Sanjay Rathod) यांची चौकशी केली जाईल. सरकार चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. असेदेखील अनिल देशमुख म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला