मंत्री संजय राठोड यांच्या बचावासाठी समर्थक आणि शिवसैनिक सरसावले

Sanjay Rathod

यवतमाळ :- पूजा चव्हाण (Pooja Chavan) या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर मोठा आरोप केला आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यानंतर आता संजय राठोड यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

संजय राठोड यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर (Social Media) अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स पोस्ट केल्या जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. फेसबुकवरही त्याच्या समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. ‘जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती, उसकी बदनामी शुरु की जाती है!!’ अशी पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर केली आहे. यासह अनेक समर्थकांनी त्यांच्या समर्थनासाठी फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत.

पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत पुण्यात रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यानंतर राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ही बातमी पण वाचा : पूजा चव्हाण आत्महत्या : संजय राठोड ‘नॉट रिचेबल’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER