पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण; संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

यवतमाळ : राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूचे समाजाला दु:ख झाले आहे. तिच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण केले जात असल्याचे वक्तव्य राठोड यांनी केले . माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका, असेही राठोड म्हणाले .

पूजा चव्हाण ही बंजारा समाजाची मुलगी होती. तिच्या मृत्यूमुळे संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झाले आहे. आम्ही सगळे चव्हाण कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घाणरेडे राजकारण करण्यात आले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय आयुष्यात आहे, माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार पाहण्यास मिळाला आहे. प्रसारमाध्यमातून जे काही दाखवण्यात आले होते. त्यामध्ये काहीही तथ्य नाही, असा खुलासा राठोड यांनी केला.

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पोलीस चौकशी सुरू आहे. जे काही चौकशीतून जे काही सत्य समोर येईल, ते सर्वांनी पाहावे’, असेही राठोड म्हणाले.

मी काही १५ दिवस कुठेही गेलो नव्हतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, आई वडील वृद्ध आहे. त्यांच्यासोबत १० दिवस होतो. या काळात मी त्यांच्यासोबत होतो. १० दिवस शासकीय बंगल्यावरून काम पाहिले. अमोल राठोड कोण आहे, हे मला माहिती नाही. माझ्यासोबत सर्वच जण फोटो काढत असतात. पण, एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असेही संजय राठोड म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER