भाजप सोडून जाणार नाही : खा. संजय पाटील

सांगली : कोणाला काहीही वाटलं तरी मी भाजपमध्येच राहणार आहे. मी जिल्ह्यातील कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. मी जिल्ह्यातील अन्य कोणत्या कार्यक्रमात गेलो म्हणून मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मी भाजपमध्येच (BJP) राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी दिली.

जिल्ह्यात तुम्ही भाजपमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता, माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, मला पक्षातून कोणी घालवायला बसले असतील किंवा कोणाला वाटत असेल मी बाहेर जावं तर तस काहीही होणार नाही. मी भाजपमध्येच राहणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER