संजय पांडेंकडून तडजोडीसाठी दबाव; परमबीर सिंग यांची सीबीआयकडे लेखी तक्रार

Parambir Singh - Sanjay Pandey - Maharashtra Today
Parambir Singh - Sanjay Pandey - Maharashtra Today

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी तडजोड करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी न्यायालयातही याचिका दाखल केली होती. आता त्यांनी थेट सीबीआयकडे (CBI) लेखी तक्रारही दिली आहे. त्यामुळे पांडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून, या प्रकरणात पांडे यांची सीबीआयकडून चौकशी केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे एका वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच पांडे यांनी सिंग यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचं या पुराव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनिल देशमुख प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, परमबीर सिंग यांची चौकशी करू शकणार नाही, असं संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्राद्वारे कळवलं आहे. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी पांडेंनी दबाव टाकल्याची लेखी तक्रार सीबीआयकडे दिली आहे. हे तक्रार पत्रच ‘वृत्तवाहिनीच्या’च्या हाती लागलं आहे.

तसेच सिंग आणि पांडे यांचं  व्हॉट्सॲप आणि फोनवरील संभाषणही हाती लागलं असून त्यातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलीस महासंचालक पांडे यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारविरोधातील तक्रार कोणत्याही परिस्थिती मागे घ्या, असं सांगत पांडे यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, असा दावा सिंग यांनी या पत्रात केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button