मुंबईत मोदींच कार्यक्रम असल्यानं, संजय निरुपम याना ठेवण्यात आलं नजरकैदेत

Congress Leader Sanjay Nirupam

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असेपर्यंत घराबाहेर पडू नका, असा इशारा देत मुंबई पोलिसांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना स्थानबद्ध केले आहे. मोदींचे कर्यक्रम शांततेत पार पडावे यासाठी संजय निरुपमाना नजरकैदेत ठेवले असल्याचं बोललं जात आहे.

विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी मुंबईत असल्याने संजय निरुपम नोटाबंदीविरोधात आज वांद्रे कुर्ला संकुलात मूकमोर्चा करणार होते. बीकेसीमध्ये आज पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमीपूजन करणार आहेत.

मात्र त्याआधीच संजय निरुपम यांना त्यांच्या बेवर्ली हाईट्स या घरातच स्थानबद्ध केलं असून घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

आंदोलन करणारच : संजय निरुपम
पंतप्रधान आणि भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. हुकुमशाही सुरु असल्यानेच त्यांनी मला हाऊस अरेस्ट केलं आहे. खरंतर ते आमच्या आंदोलनाला घाबरले आहेत. परंतु स्थानबद्ध केलं असलं तरी मूकमोर्चा करण्यासाठी घराबाहेर पडणारच असा निर्धार संजय निरुपम यांनी केला आहे.