तर ठाकरे सरकारला धोका ; काँग्रेस नेत्याचा ‘औरंगाबाद’वर इशारा

मुंबई : रंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेनेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेनेने (Shivsena) राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, हे लक्षात ठेवावे असे त्यांनी म्हटले.

निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले की , औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, आता राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. युतीचे सरकार हे वैयक्तिक अजेंड्यावर नव्हे कॉमन मिनिमम प्रोगामच्या आधारे चालते. हा कॉमन मिनिमम प्रोगाम काम करण्यासाठी तयार करण्यात आला आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असा टोला संजय निरुपम यांनी शिवसेनेला लगावला. त्यामुळे आता शिवसेनेच्या गोटातून निरुपमांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER