शिवसनेविरोधात बोलणे पक्षविरोधी कृती आहे का? : संजय निरूपम

Sanjay Nirupam

मुंबई :- काँग्रेसने (Congress) पक्षविरोधी कारवाया करणा-या कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. पक्षविरोधी कारवाया करण्याच्या यादीत आता संजय निरुपम यांच्या नावाचाही उल्लेख होत आहे. कॉंग्रेस संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनाही घरचा रस्ता दाखवू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे .

ही बातमी पण वाचा : ‘झा’ नंतर संजय निरुपम यांचा नंबर? पक्षविरोधी कारवाया करणारे नेते कॉंग्रेसच्या रडारवर

मुंबई (Mumbai) कॉंग्रेस नेत्यांनी माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कारण, राज्याचे मुख्यमंत्री होणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या जमीन घोटाळ्याची मला चौकशी करायची होती. शिवसनेविरोधात बोलणे पक्षविरोधी कृती आहे का? , मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का? असा सवाल निरुपम यांनी ट्विटरवर केला आहे .

दरम्यान निरुपम यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी हायकमांडकडे याबाबत रिपोर्ट सादर करुन संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER