शिवसेना कधीही विश्वासघात करू शकते; संजय निरुपम यांचा टोमणा

Sanjay Nirupam criticises Shivsena

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का, याबद्दल जोरदार चर्चा झाली. काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी यावरून शिवसेनेला (Shivsena) ‘विश्वासघाती’ असा टोमणा मारला आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये निरुपम म्हणाले – ‘शिवसेना ज्यांच्यासोबत असते, त्यांच्यासोबत ती असते आणि नसतेही. अशा प्रकारे ते उपद्रव करतात. काँग्रेसने सत्तेसाठी आपला विचार, व्यवहार सोडला आणि शिवसेनेसोबत आघाडी केली. याबद्दल मी आधीपासूनच पक्षाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ज्यांच्यासोबत नाते निभावता आहेत, ते नाते निभावणारे नाहीत. ते कधीही विश्वासघात करू शकतात, हे मी वारंवार सांगितले आहे.’ काँग्रेसने महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये शिवसेनेसोबत जाऊ नये अशा मताचे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यात संजय निरुपम हेसुद्धा आहेत, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER