मातोश्री -2 साठी उद्धव ठाकरेंनी किती पैसे मोजले?; कॉंग्रेस नेत्यानी केली ईडी चौकशीची मागणी

स्टर्लिंग बायोटेक मनी लॉन्ड्रिंगचा तपास मुंबईच्या दिशेने करावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय आहे कनेक्शन? संजय निरूपम यांचा प्रश्न

मुंबई : राज्यात कॉंग्रेस शिवसेनेच्या सहकार्यामुळे सत्तेत असली तरी कॉंग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंवर हळूच काटा काढल्यासारखे हलके फुलके वार केल्याविणा राहत नाही, असेच म्हणावे लागेल. कारण आता दिल्लीतील कॉंग्रेस नेत्याने थेट उद्धव ठाकरेंचे हृद्यस्थान मातोश्री- 2 वर निशाणा साधला आहे. दिल्लीतील नेत्यांची चौकशी पुर्ण झाली असेल तर आता ईडीने मुंबईकडेही लक्ष घालावे असे म्हणत मातोश्री -2 साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखीने किती पैसे मोजले याचीही ईडी चौकशी व्हावी अशी मागणी कॉंग्रेसचे वरीष्ठ नेते संजय निरूपम यांनी केली आहे.

स्टर्लिंग बायोटेकचे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या मालमत्ता व्यवहारातून अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला सापडू शकतात. राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मातोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले, बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. मुंबईच्या बाजारभावापेक्षा अत्यंत कमी मूल्य या संपत्तीच्या खरेदीत झालं. यात चेक पेमेंटशिवाय मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करण्यात आल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे. त्यामुळे मातोश्री-2साठी उद्धव ठाकरे यांनी किती पैसे रोखीने मोजले याची ईडी चौकशी व्हावी अशी मागणी निरुपपम यांनी केली आहे.

मातोश्री 2 हे उद्धव ठाकरे यांनी राजभूषण दीक्षित (आणि त्याचा भाऊ) यांच्याकडून विकत घेण्यात आला आहे. राजभूषण यांच्या भावाला 14००० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. संदेसरा प्रकरणात त्याची सीबीआय चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात अधिक सखोल माहिती हवी आहे तर, संदेसरा प्रकरणाचा तपास मुंबईकडे वळवा या प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण –

गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेकद्वारा कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते अहमद पटेल यांची चौकशी सुरु केली आहे. आतापर्यंत तिनदा या प्रकरणात पटेल यांना ईडीच्या कार्यालयात जावं लागलं आहे. ईडीने २७ जून आणि ३० जूनला अहमद पटेल यांची पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत काही तास चौकशी केली.

ईडीच्या सूत्रांनुसार वडोदरा स्थित फार्मास्युटिकल फर्मचे मालक आणि प्रमोटर्सचे संदेसरा ब्रदर्स(चेतन जयंतीलाल संदेसरा, नितीन संदेसरा) यांच्यासोबत अहमद पटेल यांचे संबंध जाणून घ्यायचे आहेत. मागील वर्षी या प्रकरणात अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची चौकशी करण्यात आली. मात्र आता या प्रकरणात काँग्रेस नेते

संजय निरुपम यांनी नवीन ट्विस्ट समोर आणला आहे. स्टर्लिंग बायोटेक संदर्भात दिल्लीतील चौकशी संपली असेल तर ईडीने मुंबईकडे लक्ष केंद्रीत करावं असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER