संजय राठोडांचा राजीनामा फक्त मुख्यमंत्र्यांच्या खिश्यात ? भाजप आमदार म्हणतात, शिवसेना भवनात फ्रेम करुन ठेवला!

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Sucide case) प्रकरणात अडचणीत सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस झाले आहे . यावरून भाजप (BJP) आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) निशाणा साधला . राठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल संजय कुटे यांनी केला आहे.कुटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली .

राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. परंतु, मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा अद्यापही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राठोड हे अजूनही वनमंत्री आहेत. जोपर्यंत राठोडांचा राजीनामा राज्यपाल मंजूर करत नाहीत, तोपर्यंत राठोडांनी राजीनामा दिला असं म्हणता येणार नाही, असं सांगतानाच राजीनामा राठोडांकडे पाठवण्यासाठी इतके दिवस का लागत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवावा. त्यांचा राजीनामा मातोश्री किंवा शिवेसना भवनात फ्रेम करून ठेवला आहे का? असा सवाल कुटे यांनी उपस्थित केला .

जोपर्यंत राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे जाऊन मंजूर होत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहिल. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER