रामदास आठवले यांना कदाचित उमेदवारी मिळेल : उदयनराजेनंतर काकडेंचे भाष्य

Sanjay Kakade-Ramdas Athawale-Udayan Raje Bhosale

पुणे :- साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभा उमेदवारीवरून टोले लावणार भाजपाचे संजय काकडे यांनी रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठ‍वले यांच्या उमेदवारीवरही भाष्य केले आहे. आठवले यांना परत उमेदवारी मिळण्याबाबत त्यांनी अंदाजही व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नावे निश्चित झाल्याची चर्चा आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले.

‘उदयनराजे पक्षात आले आणि निवडणूक हरले, तिथंच त्यांचा विषय संपला आहे, असे काकडे म्हणाले.

महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्या जागी वर्णी लागावी म्हणून भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. ‘रामदास आठवले केंद्रात सध्या राज्यमंत्री आहेत. त्यांचा पक्ष २०१२ पासून भाजपच्या सोबत आहेत. २०१४ पासून झालेल्या महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाला साथ दिली आहे. आमच्यासोबत आहेत म्हणून पक्ष कदाचित पुन्हा त्यांचा विचार करेल, असे काकडे म्हणाले. राज्यसभेच्या सात जागांसाठीची ही निवडणूक बिनविरोध होईल, असा दावाही काकडे यांनी केला.

उदयनराजेंचे भाजपासाठीचे योगदान काय? संजय काकडेंची टीका