‘संज्या डब्लूएचओला तर वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो, महाविकास आघाडीमध्ये सगळे नग’

Nilesh Rane - rohit pawar - Sanjay raut - Maharashtra Today

मुंबई : आरबीआयनं ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या लेखा कालावधीसाठी केंद्र सरकारला ९९, १२२ कोटी रुपयांचा सरप्लस निधी देण्यास मंजुरी दिली आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरबीआयकडून मिळणाऱ्या या पैशांचा कसा वापर करता येईल याबाबतचा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्राचा पॅटर्न राबवण्याचा सल्ला देताना दिसतात. आणि यावरून माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) शेलक्या शब्दात टीका केली.

कोण रे बाबा तू सल्ला देणारा! या महाविकास आघाडीमध्ये सगळे नग भरले आहेत. संज्या राऊत डब्लूएचओला सल्ले देतो आणि वांग्या पवार केंद्राला सल्ले देतो. ह्या ठाकरे सरकारमध्ये नाक्यावरच्या रिकामटेकड्यासारखे सगळे नुसते सल्ले देत फिरतात, असं म्हणत निलेश राणे यांनी दोन्ही नेत्यांवर मिस्कील टीका केली आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button