तळीरामांना लवकर कोरोना होतो हे संजय गायकवाड यांनी समजून घ्यावे, फडणवीसांचा टोला

Maharashtra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे हाहाकार माजला आहे. या स्थितीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते’, असे विधान केले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय गायकवाड यांच्या टीकेचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ’कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी नवाब मलिक, नाना पटोले, हसन मुश्रीफ यांच्यावरही जोरदार फटकेबाजी केली. जेव्हापासून नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीनं कारवाई केली तेव्हापासून ते केंद्रावर पिसाळल्यासारखे आरोप करतात. हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणी ओळखत नाही. पियुष गोयलांवर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे. नाना पटोलेंना मी महत्व देत नसल्याने त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.

तर पोलिसांच्या चौकशीत मी कधीही हस्तक्षेप करत नाही. या प्रकरणी गृहमंत्र्यांना माझी चौकशी करायची असेल किंवा कारवाई करायची असेल तर त्यांनी खुशाल करावी. मी कारवाईच्या इशाऱ्यांना घाबरत नाही. राज्यातील जनतेच्या हितासाठी मी गेले २० वर्षे विरोधी पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवतोय. या राजकारणाच्या दरम्यान ३६ केसेस माझ्या अंगावर घेतल्या आहेत. लोकांच्या हितासाठी आणखी काही केसेस लागल्या तरी हरकत नाही, लोकांच्या हितासाठी मी कुठल्याही स्तरावर जाऊन काम करत राहील, अशी ग्वाहीपण त्यांनी दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button