संजय दत्त दुबईला रवाना

Sanjay Dutt

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) पुन्हा एकदा दुबईला रवाना झाला आहे. त्याच्यासोबत यावेळी सोनू निगम असल्याने आणि त्याने विमानातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याची माहिती मिळाली आहे. कोरोना काळातच संजय दत्तला कॅन्सर झाला. मात्र त्याने वेळेवर उपचार घेऊन कॅन्सरवर मात केली. या काळात त्याचे कुटुंब म्हणजे पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले दुबईला होती. त्यामुळे काही काळ संजय दत्तही दुबईला गेला होता. मात्र उपचारासाठी तो पुन्हा मुंबईत आला होता. उपचारानंतर त्याने काही चित्रपटांचे शूटिंगही केले. आणि आता मात्र तो पुन्हा दुबईला (Dubai) कुंटुंबासोबत गेला आहे.

एका खाजगी विमानाने संजय दत्त दुबईला रवाना झाला. या विमानात त्याच्यासोबत गायक सोनू निगमही होता. सोनू निगमही कोरोना काळात दुबईलाच होता. काही कामानिमित्त तोसुद्धा मुंबईला आला होता. सोनू निगमने संजय दत्तबरोबरचे विमानातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच विमानातला एक व्हीडियोही शेअर केला आहे. यासोबत सोनू निगमने लिहिले आहे, पुन्हा एकदा मी दुबईला जात आहे. माझ्यासोबत आहे शूर संजय दत्त भाई आणि त्याची मुले. याशिवाय आमच्यासोबत माझा ड्रायव्हर मुन्ना मुजनाबीनही आहे. संजय दत्तला आनंदी पाहून मला खूप आनंद होत आहे. या दोघांबरोबरच आमच्यासोबत माझा भाऊ हरीश वसवानीची सासू सोनी हेमनानी ही आहे. या ट्रिपचे हे काही फोटो असेही सोनूने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER