संजय दत्त पूर्ण करतोय चित्रपटांचे शूटिंग

Sanjay Dutt

फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त संजय दत्त (Sanjay Dutt) आपल्या अपूर्ण चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तला श्वास घेताना त्रास होत आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी केल्यानंतर त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. उपचारासाठी संजय दत्त अमेरिकेला जाणार आहे, त्याला अमेरिकेचा व्हिसाही मिळाला आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. संजय दत्तवर केमोथेरेपी सुरु करण्यात आली आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाला असून लवकरच केमोचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. मध्ये हाताशी वेळ असल्याने संजय दत्तने अपूर्ण चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. संजय दत्तने यशराजच्या शमशेराचे शूटिंग केल्याची माहिती संजय दत्तच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिली. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारीत आहे. करम से डकैत, धरम से आजाद अशी टॅग लाईन असलेल्या या चित्रपटात रणबीर आणि संजय दत्तमध्ये हाणामारीचे अनेक सीन आहेत. संजय दत्तने अशाच काही दृश्यांचे शूटिंग केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर केजीएफ 2, पृथ्वीराज आणि तोरबाज चित्रपटाचे उरलेले काम संजय दत्त पूर्ण करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER