सानिया मिर्झाचे यशस्वी पुनरागमन

Sania Mirza makes successful comeback

होबार्ट (ऑस्ट्रेलिया): दुहेरीतील माजी नंबर वन भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन वर्षानंतर स्पर्धात्मक टेनिसमध्ये यशस्वी पुनरागमन केले आहे. होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत ती आणि तिची साथीदार युक्रेनची नादिया किचेनोक यांनी ओक्साना कलाश्निकोव्हा व मियू काटो या जोडीला 2-6, 7-6(3), 10-3 असे पराभूत केले. यासह सानिया- नादिया जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे.

या विजयानंतर सानिया म्हणाली की आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खास दिवस आहे. साधारण अडीच वर्षानंतरच्या या सामन्यासाठी माझे आई-वडील आणि माझा बेबी बॉय ईझान मला प्रोत्साहन देण्यासाठी हजर होते. आणि त्यांच्यासमोर पुनरागमनात मी जिंकले याचा अधिक आनंद आहे.

सिंधू-साईना यांच्यात का नाही मैत्री, प्रशिक्षक पी.गोपीचंद यांनी केले रहस्य उघड

सानिया बाळंतपणामुळे गेल्या दोन वर्षांपासून टेनिसपासून लांब होती. त्यानंतरचा तिचा हा पहिलाच सामना होता. ऑक्टोबर 2017 मधील चीन ओपनपासून ती स्पर्धा खेळलेली नव्हतीआणि सध्या ती प्रोटेक्टेड रँकिंगसह खेळत आहे.

पहिला सेट गमावल्यावर सानिया- नादिया जोडीने दुसरा सेट जिंकल्याने लढत टायब्रेकमध्ये गेली. दुसरा सेटही अटीतटीचा झाला. मात्र त्यांनी टाय ब्रेकर सहज जिंकला.

सानिया- नादिया जोडीचा पुढचा सामना आता अमेरिकन जोडी ख्रिस्तिना मॕकहेल व वानिया किंग यांच्याशी होईल.
.