सानिया, निरुपमानंतर आता अंकिता रैना खेळणार ग्रँड स्लॕम स्पर्धा

Tennis Player

अंकिता रैना ही ग्रँड स्लॕम टेनिस स्पर्धेच्या मेन ड्राॉमध्ये स्थान मिळवणारी केवळ तिसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. तिच्या आधी सानिया मिर्झा आणि सानियाच्या आधी निरुपमा वैद्यनाथनने (1998 आॕस्ट्रेलियन ओपन) हा मान मिळवला होता. अंकिताने रविवारी महिला दुहेरीच्या मुख्य गटात स्थान निश्चित केले. एकेरीच्या मेन ड्रॉसाठीही ती लकी लुजर होती पण तिथे तिला नशिबाची साथ लाभली नाही. मात्र या 28 वर्षीय खेळाडूचे दुहेरीत स्वप्न साकार झाले. रुमानियाच्या मिहायेला बझार्नेकू सोबतची तिची जोडी आॕस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीसाठी पात्र ठरली आहे. दुहेरीच्या मेन ड्राॕमध्ये केवळ सानिया आणि आता अंकिता या दोनच भारतीय महिला मेन ड्रॉमध्ये खेळल्या आहेत. निरुपमा वैद्यनाथन ही एकेरीत खेळली होती.

अंकिता ही पहिल्यांदाच ग्रँड स्लॕमच्या मेन ड्रॉत खेळणार आहे. म्हणून एकेरी असो की दुहेरी, ही बाब खास असल्याचे तिने म्हटले आहे. कितीतरी वर्षापासूनची मेहनत आणि संघर्षानंतर मी येथवर पोहोचली आहे. माझ्या मेहनतीला कितीतारी लोकांचे आशीर्वाद व प्रोत्साहनाचे पाठबळ आहे. ते मी विसरु शकत नाही, दुहेरी असले तरी तिथे भारताचे नाव असेल हे महत्त्वाचेआहे, यामुळे किमान काही जणांना प्रेरणा तरी मिळेल, ग्रँड स्लॕम स्पर्धेत खेळायला मिळावे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्नअसते, कदाचित पुढल्या वर्षी मी एकेरीत खेळेल असे अंकिताने म्हटले आहे.

तिची साथीदार रुमानियन खेळाडू मिहायेला ही डावखुरी असून ती एकेरीत कधी टॉप 3 मध्ये होती. त्यांचा पहिला सामना आॕलिव्हिया गॕडेकी व बेलिंडा वूलकाॕक जोडीशी होईल.

मिहायेला पार्टनर शोधतेय असे मला मित्रांकडून समजले होते. त्यानंतर मी तिच्याशी बोलले आणि ती सोबत खेळायला तयार झाली. तिच्यासोबत मी पहिल्यांदाच खेळणार आहे. हा अनुभव कसा राहतो याची मला उत्सुकता आहे असे तिने म्हटले आहे.

आता यंदाच्या आॕस्ट्रेलियन औपनमध्ये चार भारतीय खेळाडू आहेत. एकेरीत सुमीत नागल, दुहेरीत रोहन बोपन्ना व दिवीज शरण हे दुहेरीत खेळणार आहेत. नागलचा पहिला सामना लिथुआनियाच्या रिकार्दास बेरांकिससोबत आहे. बोपन्नाचा दुहेरीत साथीदार जपानचा बेन मॕकलाचलन तर शरणचा साथीदार स्लोव्हेकिया इगोर झेलेने आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER