सांगलीची चिन्मयी भोकरे दिग्दर्शित “बॅगफुल ऑफ लव्ह’ या लघुपटाला हॉटस्टारवर प्रतिसाद

चिन्मयी भोकरे

सांगली : सांगलीतील (Sangli) चिन्मयी भोकरे हिने तो दिग्दर्शित “बॅगफुल ऑफ लव्ह’ या लघुपटाला हॉटस्टार (Hotstar) या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उदंड प्रतिसाद मिळत आहे. मध्यमवयीन सख्ख्या शेजाऱ्यांचं सततच भांडण आणि शेवटी त्याचं प्रेमात पडणं.. एका दहा मिनिटांचा लघुपटात मांडला आहे.

वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे लघुपटांना गेल्या काही वर्षात उदंड प्रतिसाद मिळत आहे. नवनव्या कलावंतासाठी ती सुसंधी ठरतेय. सध्याच्या टाळेबंदीत तर हेच चित्रपट प्रदर्शनाचं माध्यम ठरतंय. “हॉटस्टार’ने या लघुपटाची निवड केल्याने चिन्मयीच्या पाठीवर कौतुकाची थापच पडली आहे. चिन्मयीने यापुर्वी सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वुडस्‌ या दिग्दर्शनाची पदविका घेतली आहे. हा लघुपट तिच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. ये दिल है मुश्‍किल. कलंक आणि उरी या चित्रपटांसाठी तीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्‍शनसोबत तीने काही काळ उमेदवारी केली आहे. आता स्वतः चित्रपट निर्मितीच्या तयारीत आहे. या लघुपटासाठी विद्यासागर, तारिक महंमद, सलोनी धात्रक यांचे सहकार्य मिळाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER