सांगलीत पुन्हा राजकीय भूकंप? राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेते सतर्क

मुंबई : सांगली महानगरपालिकेतील (Sangli Municipal Corporation) महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) खेळण्यात आलेल्या खेळीचा भाजपच्या नेत्यांनी प्रचंड धसका घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी सांगलीत भाजपच्या (BJP) जिल्हा परिषद (Sangli ZP) पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम बारगळला. त्यामुळे या पदांसाठी इच्छूक असलेले भाजपमधील स्थानिक नेते नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक हालचालीवर सतर्कता बागळली जात आहे . भाजपच्या नेत्यांकडून बैठका घेतल्या जात आहेत, एकमेकांना फोनाफोनी केली जात आहे. त्यामुळे आता सांगलीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सांगलीत काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER