वातावरणीय बदलामुळे घरोघरी ‘व्हायरल’चा ताप

Sangli -Viral fever due to climate change

सांगली : काही दिवस कडक उन्ह, मध्येच पडणारा मुसळधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे वाढलेला गारठा अशा समिश्र वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शनचे (Viral infection) रुग्ण वाढत आहेत. घराघरात अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे वाढल्याचे चित्र आहे. रुग्णालयात गेलो तर कोरोना तपासणीची धास्ती रग्णांनी घेतली आहे. ऋतुसंक्रमणामुळे होणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

मे-जून, सप्टेंबर-ऑक्टोबर, जानेवारी-फेब्रुवारी हा कालावध ऋुतूसंक्रमणाचा असतो. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलामुळे अंगदुखी, सर्दी-खोकला ताप आदी रुग्ण संख्या वाढते. सध्या पावसाळा संपूण हवेत गारठा आणि उष्मा असे संमिश्र वातावरण असल्याने डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. तसेच नदी पात्रात आजूबाजूचे पाणी आल्याने दुषीत पाण्यामुळे जलजन्य आजाराही याकाळात डोके वर काढतात. गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरियाची रुग्ण संख्याही वाढते. ढगाळ वातावरण, कधी पाऊस तर कधी कडक उन्ह मध्येच थंडी यामुळे वातावरणात जीवाणू-विषाणूंची वाढ झाली आहे. परिणामी व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

रुग्णालयात गेल्यास कोरोनाची तपासणी करावी लागेल या धास्तीने अनेकजण घरीच उपचार करत आहेत. अंगावर काढून दुखणे बळावल्यास न्युामेनिया होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साथीच्या आजारांवर वेळीच उपचार करण्याची गरज आहे. दोन-तीन दिवसांसाठी असणाऱ्या या आजारांची भिती न बाळगता वेळीच औषध उपचार करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

वातावरणातील बदलामुळे विषाणू संसर्ग वाढत आहे. मास्क वापरणे, योग्य सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. गरम पाणी पिणे, कोमठ पाण्यात मिठ टाकून गुळण्या आदी प्राथमिक उपचार करावेत. त्याजोडील वैद्यकीय तपासणी आणि औषधउपचार करुन घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER