कोरोना लसीकरणासाठी सांगलीत टास्क फोर्स

Abhijeet Chaudhari - Coronavirus Vaccination

सांगली : कोरोना (Corona) लसीकरण लवकरच होणार आहे. लसीकरणाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन केले आहेत. शीत साखळी केंद्रे सज्ज झाली आहेत. डीप फ्रीझर, आईसलाईन रेफ्रिजरेटर कार्यान्वित आहेत. पहिल्या टप्प्यात ३० हजार हेल्थ केअर वर्कर यांचे लसीकरण होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (Abhijeet Chaudhari) यांनी सूक्ष्म नियोजन करून लसीकरणाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे.

लसीकरणासंदर्भात जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय टास्क फोर्स स्थापन झाले आहेत. जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘आयएमए’चे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह २५ प्रतिनिधींचा समावेश आहे. तालुकास्तरीय टास्क फोर्समध्येही २० ते २२ प्रतिनिधींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून टास्क फोर्सवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संबंधितांना कळविले जाणार आहे. कोरोनाच्या लसींसाठी आरोग्य यंत्रणांकडील उपलब्ध शीत साखळी यंत्रणा सज्ज आहे.

जिल्ह्यात ९२ शीत साखळी केंद्रे आहेत. डीप फ्रीझर १२६ आहेत. त्याची क्षमता ११ हजार ६९६ लिटर इतकी आहे. त्यापैकी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे ८ हजार २३२ लिटर, ग्रामीण रुग्णालयांकडे १ हजार ५८४, मनपा आरोग्य यंत्रणेकडे १ हजार ८८० लिटर इतकी क्षमता आहे. आईसलाईन रेफ्रीजरेटर १४० असून ८ हजार ७६० लिटर क्षमता आहे. त्यापैकी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे ६ हजार १३७, ग्रामीण रुग्णालयांकडे १ हजार १२० आणि मनपा आरोग्य यंत्रणेकडे १ हजार ५०१ लिटर क्षमता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER