शरद पवार यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीच्या नेत्याचा प्रतिसाद; सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर्स दिले

Sharad Pawar

सांगली : राज्यात कोरोनाने (Corona virus) थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनाच्याच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना काळात नागरिकांचे होणारे हाल आणि ऑक्सिजनअभावी अनेकांनी प्राण गमावले. हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या नेत्यांना सर्वसामान्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. आमदार लाड यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला .

आमदार अरुण अण्णा लाड यांनी आपल्या फंडातून सांगली जिल्ह्याला तीन व्हेंटिलेटर्सची मदत केली आहे. २५ लाख रुपये किमतीचे तीन व्हेंटिलेटर्स सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हेंटिलेटर्स सुपूर्द कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, आमदार अरुण अण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासनालाही अनेक पातळ्यांवर अडचणींना सामोरं जावं लागलं. व्हेंटिलेटरची मोठी गरज भासत होती.

कोरोना संसर्गाची दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सर्व साखर कारखानदार, राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी आपल्या फंडाच्या माध्यमातून तीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स सांगली जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केले. यामुळे रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम होणार असून समाजातील इतर उद्योजकांनीही सरकारच्या नव्हे, तर समाजाच्या मदतीसाठी पुढे येणं गरजेचं असल्याचं मत अरुण लाड यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button