सांगली महापालिकेचा प्रस्तावित अर्थसंकल्प स्थायीसमोर सादर

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा सन 2019 – 20 चा सुधारित आणि 2020 – 21 चा 675.23 कोटी आणि 58,86431इतका शिल्लकीचा मूळ अर्थसंकल्प प्रशासनाकडून आयुक्त नितीन कापडणीस यांनी गुरुवारी स्थायी समितीचे सभापती संदीप आवटी यांच्याकडे सादर केला. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते. विशेष म्हणजे टॅबलेटमध्ये समाविष्ट असणारा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याचे प्रोजेक्टरवर सादरीकरण करण्यात आले.

प्रभाग समिती 1 ते 4 क्षेत्रातील खुल्या जागा, भूखंड, भु भाडे, व मनपाच्या इतर जागांमध्ये शुल्कवाढ , उद्यान विभागाकडील कर, शुल्कमध्ये दरवाढ, अग्निशमन आणि आणीबाणी विभागाकडील दरवाढ, पाणीपुरवठा विभागाकडील कर , दरवाढ, आरोग्य विभागाच्या अस्वच्छ भूखंड दंड आणि वार्षिक शुल्कात वाढ तसेच मार्केट लायसेन्स दारात वाढ, मालमत्ता विभागाकडील खासगी जागेतील होर्डिंग , इलेकंट्रोनिक होर्डिंग, जाहिरात फलक, इलेकंट्रोनिक जाहिरात फलक कर , शुल्कमध्ये वाढ, दैनिक परवाना फी वसुली दरात सुधारणा व खोकी व पुनर्वसन गाळे, दुकानगाळे, लाकडी स्टोलमध्ये वार्षिक भाडेवाढ, दुकानगाळे वारसांना खोकी , दुकानगाळे हस्तांतर करणेसाठी दर सुधारणा , नगररचना विभागाकडील छाननी शुल्क, जमीन विकास रेखांकन, बांधकाम, सुरक्षा अनामत व इतर शुल्क, करवाढ, स्वच्छता उपयोगकर्ता कर आदी उपाययोजनांच्या आधारे महापालिकेच्या उत्पन्नात वार्षिक 25 कोटी रुपयांची अधिक आर्थिक भर पडणार आहे.

त्याचबरोबर 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात केंद्र आणि राज्य शासनाकडून पुढील योजना व काही नवीन योजना शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचा मनपाचा मनास आहे त्या आशा मिरज अमृत पाणी योजना, सुवर्णजयंती महाराष्ट्र नाग्रोथान योजना सांगली व मिरज ड्रेनेज योजना प्रस्तावित कुपवाड ड्रेनेज योजना, सुवर्णजयंती महाराष्ट्र नाग्रोथान योजना 100 कोटी, घनकचरा व्यवस्थापन (डीपीआर) अमलबाजवणी, जिल्हा नियोजन योजना – रस्ते विकास व नाविन्यपूर्ण योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना ,15 वा वित्त आयोग, काळी खण विकसित करणेहवा प्रदूषण प्रतिबंध कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे.