सांगली महापालिका आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल करणार : माजी नगरसेवक बर्वे

Sangli municipal corporation

सांगली :- सांगली महापालिकेच्या शासकीय लेखा परिक्षणानंतर सुमारे सोळाशे कोटीं रुपयांची रक्कम वसुलीस पात्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये वसंतदादा बॅँक, बीओटीसह इतर कामांतील घोटाळ्यांचा समावेश आहे. संबधीतांवर भार, अधभार निश्चित करुन त्या रक्कमेच्या वसुलीचे आदेश लेखापरिक्षक, न्यायालयाने दिल्यानंतरही महापालिका प्रशासन आदेशांची अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे आता आयुक्तांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. यासंदर्भात आयुक्तांना वकीलांमार्फत दावा पूर्व नोटीस पाठविली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक वि. द. बर्वे यांनी शुक‘वारी पत्रकारांना दिली.

बर्वे म्हणाले, शासनाच्या नगर विकास खात्याच्या आदेशाची दखल घेत आयुक्तांनी तत्कालीन नगरसेवकांनी बेकायदेशीरपणे महापालिकेच्या पैशातून छापून घेतलेल्या लेटर हेडची वसुली सुरु केली आहे. याबाबातही लेखा परिक्षणात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याप्रकरणी 122 नगरसवेकांना नोटीसा बजावल्या असून त्यांच्याकडून सहा लाख ऐंशी हजार रूपयांची वसुली केली जाणार आहे. काहींनी आपल्या वाट्याची रक्कम भरली आहे. परंतु इतर वसुलीचे काय ?. असा माझा सवाल आहे. आपल्या मागणीमुळे महापालिकेचे 98 ते 2015 पर्यंत विशेष शासकीय लेखा परिक्षण झाले. यामध्ये सुमारे सोळाशे कोटींच्या रकमा वसूल पात्र आढळल्या आहेत.

वरिष्ठांना वाचविण्याचा प्रयत्न :- बर्वे

बर्वे म्हणाले, बीओटी अंतर्गत महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोक्याचे जागा बिल्डरना विकण्यात आल्या. यामध्ये महापालिकेचे कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याही नुकसानीची संबधीतांकडून वसुली करण्याची शिफारस लेखापरिक्षणात करण्यात आली आहे. याबाबत माजी आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी एक चौकशी समिती नेमली होती. या समितीने तत्कालीन दोन आयुक्तांसह पदाधिकारी आणि िअधकार्‍यांना दोषी धरले आहे. हा अहवाल महापालिकेला आणि शासनाला सादर झाला आहे. परंतु सध्या महापालिकेकडून तो सापडत नसल्याचे सांगितले जात आहे तर शासनाने न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर हा अहवाल मध्यंतरी मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळाल्याचे म्हटले आहे. शासनातील वरीष्ठ िअधकार्‍यांना वाचवण्यासाठी हा खटाखोट आहे.