सांगली : जयंत पाटीलांच्या फोडाफोडी राजकारण, काँग्रेस नाराज

Mohanrao Kadam - Jayant Patil

सांगली :- प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे, मात्र ते करताना आघाडीधर्माचे तत्त्वही पाळणे आवश्यक आहे, असा सल्ला कॉंग्रेसचे सांगली (Sangli) जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम (Mohanrao Kadam) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना दिला आहे.

विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह नऊ संचालक, तसेच युवक कॉंग्रेसचे (Congress) सांगली शहर अध्यक्ष अजित दुधाळ यांच्यासह काही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दोन महिन्यांपूर्वी कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेशही अखेरच्या क्षणी बारगळला होता. यावरून सांगलीतील काँग्रेस गोटात प्रचंड अस्वस्थता आहे.

कॉंग्रेसच्याच लोकांना राष्ट्रवादीत प्रवेश देणे हे धोरण बरोबर नाही. राज्यात महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी घटक पक्ष आहेत. दोन्ही पक्ष गेली दोन दशके आघाडी म्हणून एकत्र आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. कॉंग्रेस हा राष्ट्रवादीचा मित्र पक्ष आहे. आघाडीचे तत्त्व पाळले पाहिजे. आघाडीतील मित्र पक्षाचे कार्यकर्ते, नेते फोडून पक्ष मोठा करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे आमदार कदम यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : सांगलीत शेतीचे मोठे नुकसान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER