सांगलीत जनता कर्फ्यूचा फज्जा

Sangli

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्यूचा बोऱ्या वाजल्याचे चित्र आहे. काही गावे वगळता सर्वत्र बाजारपेठा, रस्त्यांवर नियमित गर्दी दिसत आहे. सर्व शासकीय कार्यालयांतही कामासाठी नागरिकांची झुंबड आहे. सांगली मारुती चौक, गणपती पेठ, हरभट रस्ता, बसस्थानक रस्ता, सराफ पेठेसह सर्वच उपनगरांमध्ये नागरिकांची रेलचेल सुरूच होती. एकूणच प्रशासन लोकप्रतिनिधी, व्यापाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनता क्यों फ्लॉप शो झाला.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. दररोज हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. तर रेकॉर्डब्रेक रुग्ण सापडत आहेत. मृत्यूचेही प्रमाण अन्य जिल्हे, राज्य, देश आणि जगात सर्वाधिक आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड व उपचाराअभावी रुग्णांचे तडफडून मृत्यू सुरू आहेत. मृत्यू पश्चात अंत्यसंस्कारासाठीही 15 ते 20 तास खोळंबा होतो. एकूणच हाहा:कार माजला असताना प्रशासन मात्र यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटल उभारणी, उपचाराची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेचीच जबाबदारी म्हणत खबरदारीसाठी ‘जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. व्यापारी प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय नसल्याने सांगलीत जनता कर्फ्यूचा पुरा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER