धक्कादायक : सांगली बनतेय गांजा विक्रीचे आंतराष्ट्रीय केंद्र

cannabis sales center.jpg

सांगली : पोलीसांच्या वरदहस्तामुळेच सांगली (Sangli news) जिल्ह्यात गांजा विक्रीचे जाळे पसरले (cannabis sales center) आहे. कर्नाटक पोलिसांनी शनिवारी मिरजेत गांजावर केलेल्या कारवाईनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सांगली हे गांजा विक्रीचे आंतरराष्ट्रीय केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पोलिस साखर झोपेत असताना कर्नाटक पोलिसांनी केलेली कारवाई डोळ्यात अंजन घालण्यासारखीच आहे. मिरजेतून कर्नाटक, आंध्रसह अन्य राज्यात पुरवठा होत असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले.

जत तालुका गांजा निर्मितीचे आगार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सुरुवातीच्या काळात जत तालुक्यात गांजा निर्मिती करणाऱ्यांवर सुरूवातीला कारवाई केली होती. नंतर मिरजेचे उपअधीक्षक संदीप सिंह गिल यांनी मे महिन्यात 10 किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर मात्र फारशी कारवाई झालीच नाही. मात्र आता कर्नाटक पोलिसांनी मिरजेत येऊन कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या ‘कार्यतत्परता बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सन 2017 मध्ये कुंडल येथे 100 किलो गांजा पकडण्यात आला होता.

नंतर जिल्ह्यात एकही मोठी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गांजा सापडूनही गांजा उत्पादक, तस्कर आणि विक्रेत्यांवर किरकोळ स्वरूपात कारवाई झाली. जत तालुक्यात उत्पन्न केलेल्या गांजाची सीमावर्ती भागात गोदामे होती. कर्नाटक पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मिरजेत गांजा विक्री आणि साठ्याचे केंद्र करण्यात आले आहे. पूर्वी जत आणि सीमाभागातून होणारी गांजाची तस्कारी आता सर्रास मिरजेतून होत आहे. मिरजेतून बंगळूर, हैदराबाद, मुंबई, पुण्याकडे गांजा पाठविला जातो. कर्नाटक आणि गोव्यालाही मोठ्या प्रमाणात या परिसरातून गांजा पुरवला जात असल्याचे सांगितले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER