सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना कोरोनाची लागण

Suhel Sharma -Corona Positive

सांगली : सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (District Superintendent ) सुहेल शर्मा (Suhel Sharma) यांना कोरोनाची (Corona Positive) लागण झाली आहे. त्यांना त्रास जाणवत असल्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते होम क्वारंटाइन (Home Quarantine) आहेत.त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत पोलिस अधीक्षक शर्मा हे जिल्ह्यातील स्थितीवर नियंत्रण ठेवणे, पोलिस बंदोबस्त, आढावा बैठका यामध्ये सातत्याने सक्रिय होते. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रशासकीय बैठका, पोलिस अधिकाऱ्यांसोबत नियोजन या कामासाठी सतत दौरा करत होते. दोन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर घरी उपचार सुरू असून प्रकृती ठीक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER