सांगलीत चर्चा एसपी सुहेल शर्मा यांच्या जंगी स्वागताची

Police

सांगली : सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी नुकतीच कोरोनावर मात केली. यानंतर ते आज गुरूवारी कार्यालयात हजर आले. एसपी सुहेल शर्मा यांचे यावेळी जल्लोषी स्वागत करण्यात आले. सुहेल शर्मा यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी अधिकाऱ्यांत जणू स्पर्धाच लागली होती. सुहेल शर्मा त्यांच्या मार्गात फुलांचा सडा घालण्यात आला होता. ते येत असताना महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षावही केला. हे कमी होते म्हणून की काय साहेबांच्या स्वागतासाठी बेंड-बाजाही वाजविण्यात आला. पोलीस अधीक्षकांनाही सामाजिक बहिष्काराची भिती वाटते काय अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने समाज माध्यमात उमठत आहे.

कोरोना संसर्गानंतर सर्वसामान्यांतून रुग्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची भिती होती. रुग्णाचे मानसिक संतुलन ठिक रहावे, तो पूर्ण बरा झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाचमहिन्यापूर्वी रुग्णाचे स्वागत करण्याची प्रथा होती. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येचे जणू विस्फोटच झाला. रुग्णाला उपचार मिळायची पंचायत झाली. उपचाराविना जीव जाणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असे असताना सामाजिक बहिष्कार हा विषय कुठल्या कुठे गळून पडला.

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २५ हजार ६५३ इतकी झाली आहे. १५ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यांचे कुठे स्वागत झाले. त्यांना उपचार मिळविणे हेच त्यांच्यासाठी जीवदान होते. ९ हजार २४७ रुग्ण असून अजूनही सांगलीतील स्थिती स्फोटक आहे. ९७९ लोकांना जीव गमवावा लागला. मृतांचा आकडा रोज नवा उच्चांक ठरत आहे, अशा स्थितीत पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने लढाई जिंकल्यासारखे फुलांचा वर्षाव करुन घेणे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयात उमठत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER